Home क्राईम अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळविले

0
34

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ डिसेंबर रेाजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला अरबाज उर्फ गुड्डू फिरोज पठाण रा. रांजणगाव ता.चाळीसगाव याने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिचा कुठेही मिळून आली नाही. अखेर मुलीच्या नातेवाईकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव अरबाज फिराज पठाण यांनी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अरबाज उर्फ गुड्डू फिरोज पठाण रा. रांजणगाव ता.चाळीसगाव याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लोकेश पवार करीत आहे.


Protected Content

Play sound