Home Cities अमळनेर कारण नसतांना तरूणाला काठीने बेदम मारहाण

कारण नसतांना तरूणाला काठीने बेदम मारहाण

0
42


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसरे येथे एका तरुणाला काहीही कारण नसताना दारूच्या नशेत एकाने शिवीगाळ करून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवार २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शत्रुघ्न नागराज कोळी (वय-३२, रा. पाडळसरे ता. अमळनेर) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतो. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता शत्रुघ्न कोळी हा गावातील दीपक किराणा दुकानासमोर उभा होता. त्यावेळी गावातील ज्ञानेश्वर भिकन कोळी हा तिथे आला आणि काहीही कारण नसताना दारूच्या नशेत शिवीगाळ करू लागला. तसेच हातातील काठीने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर बुधवार २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शत्रुघ्न कोळी यांनी मारवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी ज्ञानेश्वर भिकन कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे.

 


Protected Content

Play sound