Home आरोग्य डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचना शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना दिली शपथ 

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचना शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना दिली शपथ 

0
25


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधि | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या शरीररचना शास्त्रविभागात आज प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना मृत शरीराची हेळसांड न करण्याची शपथ देण्यात आली.

मृत शरीराला सन्मान मिळावा तसेच अभ्यासासाठी मिळालेले ह्या शरीराचा अभ्यासासाठी उपयोग करू तसेच या शरीराला योग्य सन्मान देण्याची शपथ देण्यात आली.

यावेळी शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अमृत महाजन, प्रा.डॉ शुभांगी घुले, प्रा.डॉ.अनिता फटींग, प्रा.डॉ.अनिल पुंगळे, प्रा.डॉ.जमीर हे उपस्थीत होते. मान्यवरांनी शरीररचना शास्त्र विषयाचा अभ्यास करतांना करावयाचे नियोजन व याची व्याप्ती तसेच वेळेचे नियोजन या बाबत मार्गदर्शन केले. तसेच देहदानातून प्राप्त शरीराची हेळसांड न होवू देता त्या शरीराला सन्मान मिळवून देण्यासाठी शपथ देण्यात आली.


Protected Content

Play sound