सीबीएसई साउथ झोन २ बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सीबीएसई साउथ झोन २ बॉक्सिंग स्पर्धेचे १७ वयोगटातील मुलीचे सांघिक विजेतपद सेंट्रल पब्लिक स्कूल नागपूर, मोन्फोर्त स्कूल नागपूर,प्रभात किड्स स्कूल अकोला यांना तर १७ वयोगटातील मुलांचे सांघिक संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर, १९ वयोगटातील मुलांचे सांघिक संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर यांना मिळाले.

तर ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी पृथ्वीराज रोहिदास पाटील याला १७ वयोगटातील सुवर्ण पदक मिळाले. के.सी.ई.सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम शाळेत केंद्रीय माध्यमिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीबीएसई साउथ झोन २ बोक्सिंग स्पर्धेचा समारोप झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे केसीई संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर,प्रा.अशोक राणे, डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, सीबीएसई निरीक्षक प्रफुल्ल वानखेडे, मिलन वैद्य, शशिकांत पाटील,शाळेच्या प्राचार्य सुषमा कंची व मीना चटर्जी तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थित होते. ओरियन सिबीएसई स्कूल च्या प्राचार्य सुषमा कंची यांनी प्रास्ताविकात केले.

यावेळी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यातील ३५० पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले. मुली सुवर्ण पदक विजेते १७ वयोगटा खालील ३६ ते ४० किलोग्राम वजन प्रकारात आर्या एस.(केरळ),४० ते ४४ कि.ग्रा. साक्षी संजय आवटे,४४ ते ४८ कि.ग्रा. पालक झांबरे,४८ ते ५२ आदिती कदम (महाराष्ट्र)५२ ते ५६ कि.ग्रा. श्रुती मोरे,५६ ते ६० कि.ग्रा. शान्वी महाजन (महाराष्ट्र),६० ते ६५ कि.ग्रा. जान्हवी महान्केले,६५ ते ७० कि.ग्रा. क्रीशिका महेष्कर,७० ते ७५ कि.ग्रा.दिया ज्योथीस तर मुले सुवर्ण पदक विजेते १७ वयोगटातील दुर्वेश मोरवाल,३८ ते ४२ किलोग्राम शितीज पाटील,४२ ते ४६ केजी जाहिद पटेल,४६ ते ५० केजी पृथ्वीराज पाटील,५१ ते ५६ विराज रोजकरी,५६ ते ६० केजी सिदेश पावसी,६० ते ६५ मधुसूदन एच.एन.(कर्नाटक),६५ ते ७० यथार्थ बिहाद,७० ते ७५ केजी सुयेश चौगुले,८० वजनी साई जोशी यांनी विजेते पदक मिळवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष नटकर,सुरेखा काबरा व प्रेमलता चौधरी यांनी केले. यावेळी ओरियन सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व विविध भाषेतील गाणी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

Protected Content