Home Agri Trends पालसह परिसराला अवकाळी पावसाचा फटका

पालसह परिसराला अवकाळी पावसाचा फटका

0
39

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाल तसेच परिसराला आज दुपारी अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पालसह परिसरात आज दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. कडाडणार्‍या विजांसह मुसळधार पावसामुळे परिसरातील शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने केळी आणि कपाशीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या दोन दिवसांपासून परिसरात आभाळाचे वातावरण असले तरी आज परिसराला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.


Protected Content

Play sound