जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |नशिराबाद शिवारातील शेतात बांधलेली ३० हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे ज्ञानदेव विठ्ठल लोखंडे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या नशिराबाद शिवारातील शेतात त्यांची मालकीची ३० हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्यांनी गायीचा सर्वत्र शोध घेतला परंतू गाय कुठेही मिळून आली नाही. अखेर रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.