Home क्राईम जामनेर शहरातून पशूधनाची चोरी

जामनेर शहरातून पशूधनाची चोरी

0
32


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील आठवडे बाजार परिसरात वाहनातून आलेल्या सात ते आठ चोरट्यांनी गोऱ्हे चोरून नेल्याची घटना घडली आहे. तिसरा गोऱ्हा चोरत असतांना अचानकपणे एकाच्या लक्षात आल्याने चोरट्यांनी घटनास्थळाहून धुम ठोकली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील आठवडे बाजार परिसरात बांधलेले गोऱ्हे चोरण्यासाठी १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका वाहनातून सात ते आठ जण अनोळखी चोरटे आले. त्यांनी सुरूवातील दोन गोऱ्हे वाहनात कोंबले. त्यानंतर तिसरा गोऱ्हा वाहनात कोंबत असतांना मालक निसार अहेमद अब्दुल रशीद (वय-३४) रा. चाळीस मोहल्ला, जामनेर यांच्या लक्षात आल्याने धाव घेतली. त्यानंतर त्याच परिसरात राहणारे इतर जाहीरबेग जालील बेग व जावेद इकबाल मुल्लाजी रा. चाळीस मोहल्ला, जळगाव यांनी देखील धाव घेतली. हे पाहून चोरटे वाहनातून पसार झाले. याप्रकरणी निसार अहेमद अब्दुल रशीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound