Home Uncategorized सहकार पॅनलने उघडले खाते : पराग मोरे विजयी

सहकार पॅनलने उघडले खाते : पराग मोरे विजयी

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे शेतकरी विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरू असतांनाच ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांच्या रूपाने सहकार पॅनलने खाते उघडले आहे.

जिल्हा दुध संघात ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांची लढत शेतकरी विकास पॅनलच्या गोपाळ भंगाळे यांच्यासोबत होती. या लढतीत मोरे यांनी बाजी मारली आहे. ते माजी खासदार तथा माजी दुध संघ संचालक वसंतराव मोरे यांचे पुत्र आहेत. त्यांनी ३१ मतांनी विजय संपादन केला असून यामुळे सहकार पॅनलने खाते उघडले आहे.


Protected Content

Play sound