Home क्राईम जळगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ


जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या समोर एक 50 वर्षीय पुरुष जातीचा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात असून परिसरात खळबळ उडालेली आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर एका अनोळखी पुरुष जातीचा 50 वर्षे व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास आढळून आला. दरम्यान सकाळी कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत असताना येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.

दरम्यान, हा व्यक्ती भिकारी असावा त्‍याला उन्हाचा फटका बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound