Home Cities जळगाव माजी सैनिकाला मारहाण : पीआयला सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण (व्हिडीओ)

माजी सैनिकाला मारहाण : पीआयला सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण (व्हिडीओ)

0
41

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील माजी सैनिक पंकज पाटील यांना क्षुल्लक कारणावरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. पोलीस निरिक्षक अवतारसिंह चव्हाण यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चोपडा शहरातील रहिवाशी माजी सैनिक पंकज पाटील हे गणपती पुजेसाठी साहित्य व पुष्पहार खरेदी करण्यासाठी २ सप्टेंबर रोजी चोपडा शहरातील फुलांच्या दुकानासमोर दुचाकीने आले होते. त्यावेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी गाडी पार्कींगच्या क्षुल्लक कारणावरून माजी सैनिक पंकज पाटील यांना शिवीगाळ करून दुचाकीची चाबी काढून पोलीस ठाण्यात घेवून गेले. माझी चुकी नसतांना शिवीगाळ केल्याची जाब विचारला असता पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी माजी सैनिक पंकज पाटील यांना शिवीगाळ करून बेल्टने मारहाण केली. दरम्यान, यासंदर्भात वारंवार निवेदन देवून पोलीस निरीक्षक अवतारसिंह यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी सैनिक पंकज पाटील हे आपल्या परिवारासह आमरण उपोषणाला बसले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1208564079734247

 

 


Protected Content

Play sound