रावेर येथे एकाने गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

रावेर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घाडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबतचे वृत्त असे की, येथील मेहतर कॉलनीतील सुरेश बाबु रील (वय ४५) याची पत्नी माहेरी गेली होती. काल (ता. ३) रोजी तो रात्री घरी झोपला . आज सकाळी त्याचे भावाने आपला भाऊ कामावर गेला किंवा नाही हे पहाण्यासाठी गेला असता. सुरेश हा घराचे छताचे लोखंडी अँगलला  दोरीच्या सहाय्याने गळफास करून आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत किरण रील याने रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे करीत आहे.

Protected Content