Home प्रशासन तहसील यावल शहरात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध

यावल शहरात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल तसेच राज्याचे मंत्री मंगल प्रसाद लोंढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याशी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानाबद्दल येथील तालुका मराठा क्रांती मोर्चाचे वतीने तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमान जनक वक्तव्य केल्याच्या कारणावरून भगतसिंग कोश्यारी यांना तात्काळ पदमुक्त करावे तसेच राज्याचे मंत्री मंगलप्रसाद लोंढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी करून त्यांचा अवमान केला. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा वारंवार होत असलेला अवमान हा महाराष्ट्र राज्याचा अवमान असल्याचे निवेदनात नमूद करत, राज्यपाल कोश्यारी यांना तात्काळ पद मुक्त करावे तसेच अवमान, करणाऱ्या वर कारवाईची देखील मागणी निवेदनाव्दारे केली आहे. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर प्रा. मुकेश येवले, अतुल यादव, देवकांत पाटील, प्रशांत वसंतराव पाटील, नरेंद्र भागवत पाटील, दत्तात्रय कडू पाटील, गणेश येवले, बापू जासूद, अशोक पाटील, योगेश चव्हाण, सुनील गावडे, भगवान पाटील, विलास देसले, राजेंद्र टोंगळे, दत्तात्रय पाटील, स्वप्निल चव्हाण, विजय दिनकर सोनवणे, दौलत मराठे, निलेश पवार, प्रा संजीव कदम, संतोष पाटील यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound