व्हिडीओ व्हायरल करण्याची देत ४५ हजारांची खंडणी घेतल्याचा आरोप
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलेस बळजबरी एक हजार रुपये देऊन आम्ही क्राईम रिपोर्टर आणि एसीबीचे अधिकारी,कर्मचारी असल्याचे सांगून हजार रुपये दिल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून 45 हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार असलेल्या 5 पैकी तीन संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
महेंद्र सोनवणे रा. खर्दे ता. धरणगांव, कथित संपादक राजेंद्र निकम रा. वाघ नगर जळगांव (कथित रिपोर्टर)हेमंत मधुकर कोळी रा.विदगाव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. बाकी दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शाळेच्या आवारात 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ही मंडळी फिर्यादी महिलेस भेटली व आम्ही तुमच्या पतीचे परिचित आहोत असे सांगून त्यांनी महिलेजवळ बळजबरी एक हजार रुपये दिले.
या घटनेचा व्हिडीओ केला असल्याचे तसेच क्राईम रिपोर्टर असल्याचे राजेंद्र निकम याने महिलेस सांगितले.आम्ही एसीबीचे अधिकारी, कर्मचारी आहोत असे इतरांनी तिला सांगत धमकावले. महिलेसोबत अंगलगट करत 45 हजार रुपये खंडणी रुपात उकळले. तिच्यासोबत शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग करत पुन्हा खंडणी मागितल्याचा आरोप महिलेनं केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून आरोपी हे फरार होते.