Home Cities अमळनेर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पोतदार अनंतात विलीन

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पोतदार अनंतात विलीन

0
38

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दैनिक देशदूतचे अमळनेर येथील प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पोतदार यांचे आकस्मीक निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

येथील ज्येष्ठ पत्रकार व देशदूतचे तालुका प्रतिनिधी राजेंद्र बाळकृष्ण पोतदार (वय 52) यांचे बुधवारी सकाळी 11.50 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने अमळनेर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील धगधगता तारा निखळला असल्याचे बोलले जात आहे.

तरुण वयात सुरु केलेली पत्रकारिता तारुण्याला शोभेल अशीच पत्रकारीता राजेंद्र पोतदार यांनी केली. अमळनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागावर त्यांचा फोकस असायचा याच पत्रकारीतेतून आपल्या लिखाणातून त्यांनी सत्यता मांडून बऱ्याच प्रश्नाना वाचा फोडून जणसामान्यांना आपल्या लेखणीतून न्याय देण्याचा प्रयत्न केला.

एक अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार म्हणून पोतदार यांची ओळख होती. सुरुवातीला पोतदार यांनी ‘आपला अधिकार’ हे स्वतः च साप्ताहिक सुरू केले होते. त्यानंतर दै. देशदूत पेपरला शेवटच्या क्षणापर्यंत निर्भीड काम केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एक अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार म्हणून पोतदार यांची ओळख होती.


Protected Content

Play sound