पाचोऱ्यात “एक शाम शहीदो के नाम” कार्यक्रमाचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याची राजधानी मुंबई येथे २६ / ११ च्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पाचोरा पोलिस बाॅईज असोसिएशन व ग्रीन अॅपल्स इव्हेंट्स अॅण्ड इंटरटेन्टमेंट यांचे तर्फे “एक शाम शहीदो के नाम” या देशभक्तीपर गितांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील पोलिस कवायत मैदानावर दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित देशभक्तीपर गितांचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पोलिस बाॅईज असोसिएशन व ग्रीन अॅपल्स इव्हेंट्स अॅण्ड इंटरटेन्टमेंट यांच्यातर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी, परिसरातील आजी / माजी सैनिक, पत्रकार बांधव, समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

Protected Content