मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा येथे दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या कारणावरून महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अनिता आत्माराम वाघ रा. लोहारखेडा ता. मुक्ताईनगर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या कारणावरून महिलेला तिचे जेठ शांताराम फकीरा वाघ यांनी मारहाण करून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत केली. यासंदर्भात अनिता वाघ यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शांताराम फकीरा वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहे.
(टीप- या बातमीत नजरचुकीने चुक झालेली होती, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ती चुक दुरूस्त करण्यात आली आहे. चुकीबद्दल लाईव्ह ट्रेंडस न्यूज दिलगीरी व्यक्त करीत आहे.)