जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे डॉ. विपुल चौधरी यांचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी लिव्हर अँड एन्डोस्कोपी सेंटर आणि डॉ. प्रीती चौधरी यांच्या आय हॉस्पिटलचे उद्घाटन हे गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. चौधरी दाम्पत्याच्या हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सायन हॉस्पिटल, मुंबई. प्रोफेसर तथा संचालक डॉ.मेघराज इंगळे आणि सायन हॉस्पिटल मुंबई येथीलच असो.प्रोफेसर डॉ.विकास पांडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुनील चौधरी, डॉ.पुष्पा चौधरी, डॉ.प्रीती चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ.केतकीताई पाटील, हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील आणि जळगाव मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. उल्हासदादा पाटील यांनी डॉ. विपुल चौधरी आणि डॉ. प्रीती चौधरी यांचे गोदावरी परिवाराकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास मनस्वी शुभेच्छा दिल्या.