मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन साजरा

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील नगर पालिका चौकात भारतरत्न तथा देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात शिक्षण दिन साजरा करण्यात आला.

 

मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्त लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून  मौलाना अब्दूल आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. तसेच उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांच्या हस्ते सुद्धा दिपप्रज्वलन करुन आदरांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमात जिकरा एज्युकेशन सोसायटी, जामनेर संचलित जिकरा इंग्लिश मेडियम स्कूल,जामनेर व जिकरा उर्दू शाळा जामनेर यांच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करुन उपस्थितांचे मन जिंकले.सदर कार्यक्रमास , जिकरा एज्युकेशन सोसायटी जामनेर या संस्थेचे सचिव जाकिर शेख, अध्यक्ष रहिम शेख, सामाजिक कार्यकर्ते अशफाक पटेल,हारुन,जिकरा एज्युकेशन सोसायटी जामनेर चे शिक्षक आसिफ हसन ,शेख अजिज,शेख साबिर, सै.बिलाल , उजेर, एकलव्य शाळेचे शिक्षक भारत रेशवाल तसेच शहरातील असंख्य हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.मौलाना आझाद यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच मौलाना यांची शिक्षण विषयक व देशाभिमानी वृत्तीची आठवण करण्यात आली .मान्यवरांनी मौलाना आझाद यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या

Protected Content