Home Cities पाचोरा खा. संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्याचा पाचोऱ्यात जल्लोष

खा. संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्याचा पाचोऱ्यात जल्लोष


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथील तथाकथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांना बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी मा. उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटक्यांची आतिषबाजी करून पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

याप्रसंगी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, तालुका प्रमुख शरत पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, मा. नगरसेवक दत्तात्रय जडे, दादाभाऊ चौधरी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, राजेंद्र राणा, भरत खंडेलवाल, अॅड. दिपक पाटील, पप्पु जाधव, प्रविण वाघ, विलास पाटील, युवासेना शहर प्रमुख हर्षल देवरे, मा. जि. प. सदस्य राजेंद्र सांळुखे, रविंद्र पाटील, संजय चौधरी, राजेंद्र पाटील, भैय्या सोनार सह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound