पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात. अशा मागण्यांचे निवेदन आज ८ नोव्हेंबर रोजी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांना त्यांचे भडगाव रोडवरील “शिवालय” या निवासस्थानी भडगाव तालुका खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेतर्फे देण्यात आले.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दहा, विस, तीस योजना लागु केलेली आहे. सदर योजना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागु केलेली नाही. सदर योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागु करावी, माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २४ वर्षाच्या लाभाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंबलबजावणी करण्यात यावी, राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रलंबित पदोन्नतीस व अनुकंपा नियुक्तीस तात्काळ मान्यता देण्यात यावी, आकृतीबंध प्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यात यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता व धुलाई भत्ता वेतनातुन देण्यात यावा, जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन भडगाव तालुका खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेतर्फे आ. किशोर पाटील यांना देण्यात आले आहे. तसेच निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन देते प्रसंगी प्रविण पाटील, पंडितराव महाजन, मनोज अहिरे, प्रविण झाल्टे, संजयकुमार पाटील, रविंद्र गायकवाड, मनोज पाटील, संभाजी पाटील, नित्यानंद पाटील, संजय मधुकर पाटील, गुलाब पाटील, महेश पाटील, भगवान चौधरी, परेश बागल, संजय देशमुख, रविंद्र पाटील, जयसिंग राठोड, संदिप पाटील, कमलेश पाटील उपस्थित होते.