Home Cities धरणगाव धरणगावात राष्ट्रवादीतर्फे आ.सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

धरणगावात राष्ट्रवादीतर्फे आ.सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

0
37


धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तिव्र निषेध व्यक्त करत आ. अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान करून राज्यात खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी जोरदार निदर्शने केल्याचे पहायला मिळाले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगरसेविका पुष्पा महाजन, गटनेते दिपक वाघमारे, अमित शिंदे, दिपक जाधव, रविंद्र पाटील, धनराज माळी, संभाजी कंखरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound