यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या टक्केवारीच्या स्वार्थासाठी दलीत वस्तीतील निकृष्ट कामांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निळे निशान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात अशोक तायडे यांनी समाज कल्याण विभाग अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , डोंगर कठोरा तालुका यावल या ग्रामपंचायत अंतर्गत दतीत वस्तीमध्ये शासनाचे लाखो रूपये खर्च करीत काँक्रीट रस्ता व गटारी व आदी कामे करण्यात आली. ही सर्व कामे शासकीय निवेदनातील ठरवुन दिलेल्या निविदाप्रमाणे साहित्य न वापरता निकृष्ट प्रतिचे साहित्य वापरून दलीत वस्तीतील समाज बांधवांची आर्थिक स्वार्थाला बळी पडुन ठेकेदार व अधिकारी मंडळी दिशाभुल करणाऱ्या यावल पंचायत समितीतिल अधिकारी यांच्या कार्यपद्धतीची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच टक्केवारीच्या बळाच्या बळावर गुणवतापुर्ण काम न करता अत्यंत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे नांव काळ्या यादीत टाकावे तसे न झाल्यास निळे निशान संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्पाक्ष अशोक तायडे यांनी दिला आहे.