डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरु

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या नियमानुसार गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. एकूण २०० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

महाविद्यालयातील डॉ.केतकी हॉलमध्ये २९ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान एमबीबीएस प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला राऊंड सुरु आहे. नीट उत्‍तीर्ण होवून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार दुसर्‍या राऊंडची तारीख जाहिर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. एकूण चार राऊंडमध्ये प्रवेश प्रक्रिया होत असून तिसरा राऊंड हा मॉपअप राऊंड आणि चौथा राऊंड हा व्हॅकन्सी राऊंड असतो.

कमिटीद्वारे कागदपत्रांची पडताळणी प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयात कमिटी स्थापन झाली असून त्या चेअरमनपदी डीन डॉ.नारायण आर्विकर तर मेंबरपदी डॉ.दिलीप ढेकळे, डॉ.माया आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, विजय मोरे यांचा समावेश आहे. कमिटीद्वारे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयातील क्‍लरिकल स्टाफचे सहकार्य लाभत आहे.

पीजी प्रवेश प्रक्रिया रविवारपर्यंत
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पीजी कोर्सचा दुसरा राऊंड २ नोव्हेंबर पासून सुरु झाला असून रविवार दि.६ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. एकूण ४५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

 

 

Protected Content