नेहरू युवा केंद्राने राबविला बेटी बचाव, बेटी पढाव उपक्रम!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सोमवारी तालुक्यातील कढोली गावात स्थानिक विषय अंतर्गत बेटी बचाव, बेटी पढाव उपक्रम राबवून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात पथनाट्य देखील सादर करण्यात आले.

 

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी विविध उपक्रम राबविले जातात. सोमवारी तालुक्यातील कढोली गावात स्थानिक विषय कार्यशाळा अंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम ग्रामपंचायत कढोली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थिनींना प्रा.डॉ.विश्रांती मुंजेवार, प्रा.डॉ.दीपक सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य निलेश भोई आणि ज्योती भिका कोळी, आधार बडगुजर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

 

सूत्रसंचालन दिशा ढगे यांनी तर प्रस्तावना सुभाष पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे नियोजन नेहरू युवा स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील यांनी केले. पथनाट्य सादरीकरण कविता पालवे, भारती पावरा, योगिता पाटील, माधव पाटील, जयेश साळुंखे, चेतन वाघे, प्रवीण शिंदे, गोरख माळी, प्रेम वाकळे, धनंजय सोनवणे, तुषार सावळे, आर्यन अवचारे यांनी केले. आभार योगेश माळी यांनी मानले.

Protected Content