Home Cities एरंडोल शेतातील पत्र्याच्या शेडमधून कापसाची चोरी

शेतातील पत्र्याच्या शेडमधून कापसाची चोरी

0
54


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जवखेडासिम शिवारातून आज्ञात चोरट्यांनी शेतातील पत्राचे शेडमधून ८० हजार रूपये किंमतीचे १० ते १२ क्विंटल कापूस चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शंकर अर्जुन सोनवणे (वय-68, रा. जवखेडासिम ता.एरंडोल) हे शेतकरी आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड ते सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील पत्राचे शेडचे कुलूप तोडून पत्राच्या शेडमध्ये ठेवलेले १० ते १२ क्विंटल कापूस असा ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या संदर्भात शंकर सोनवणे यांनी तातडीने कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहायक फौजदार भास्कर बडगुजर करीत आहे.

 


Protected Content

Play sound