जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षेची शपथ दिली.