Home Cities भुसावळ नोटांवर हवी सरदार पटेल यांची प्रतिमा : उमेश नेमाडे यांची मागणी

नोटांवर हवी सरदार पटेल यांची प्रतिमा : उमेश नेमाडे यांची मागणी

0
34


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी चलनी नोटांवर सरदार पटेल यांची प्रतिमा हवी अशी मागणी केली आहे.

सध्या चलनी नोटांवरील प्रतिमांवरून विविध मागण्या केल्या जात आहेत. यात प्रारंभी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी माता आणि श्रीगणेशाची प्रतिमा हवी अशी मागणी केली. यानंतर विविध नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींसह विविध महापुरूषांच्या प्रतिमा हव्यात अशी मागणी केली.

दरम्यान, भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी चलनी नोटांवर अखंड भारताचे शिल्पकार असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा नोटांवर हवी अशी मागणी केली आहे. उद्याच सरदार पटेल यांची जयंती असून याच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही मागणी केली आहे.


Protected Content

Play sound