गुजरातमध्ये भयंकर दुर्घटना : पूल कोसळून शेकडो जण नदीत बुडाले

अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरामध्ये एका नदीवरील पूल तुटल्याने पाचशेपेक्षा जास्त जण नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूल तुटला, त्यावेळी किमान ४०० लोक तेथे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे ही फार मोठी दुर्घटना मानली जात असून, मृतांचा आकडाही मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा पूल सुमारे सात महिन्यांपासून बंद होता. दोनच दिवसांपूर्वी तो उघडण्यात आला. त्यानंतर हा अपघात घडला आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेनंतर अंधार पडल्याने पाण्यात लोकांचा शोध घेणे कठीण बनले आहे. मात्र, विद्युत लाईटच्या प्रकाशात नदीपात्रात बचावकार्य करण्यात येत आहे.

Protected Content