भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील भूषण मनोहर पाटील याने महिलेचा फोटो त्याच्या मोबाईलच्या स्टेटस ठेवला. त्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी महिला गेली असता तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला तसेच महिला ही शेतात जात असताना तिचा देखील पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महिलेने भडगाव पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भूषण मनोहर पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास गीते करीत आहे.
व्हॉटस्अप स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग
2 years ago
No Comments