चिदंबरम यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालय अर्ध्या तासात देणार निर्णय

chidambaram

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | आयएनएक्स मीडिया प्रकरणात आज दुपारी माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळतो की, सी.बी.आय.कोठडी मिळते. याबाबत सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून निर्णय अर्ध्या तासात देण्यात येणार आहे.

 

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिल्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यांना आज (दि.२२) सी.बी.आय.ने दुपारी सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिथे दोन्ही कडच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आहे. दोन्हीकडील तर्क ऐकून न्यायमूर्ती अर्ध्या तासात आपला निर्णय देणार आहेत.

Protected Content