श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे अनाथ व गोरगरीबांना फराळाचे वाटप

 

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानुसार दिवाळीच्या निमित्ताने नितीन दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने वेले ता.चोपडा येथे अमर संस्था संचलित मानव सेवा तीर्थ अनाथालय व वृद्धाश्रमाला २०० पाऊच, तसेच बोरगाव मतिमंद मुलांच्या वस्तीगृहात 90 हून अधिक अनाथ मुलांना व वनकुटे येथील सहवास मतिमंद प्रौढ निवासी शाळेला 70 हून अधिक दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सदरील संस्थेने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव केंद्राला आभार पत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे धरणगाव शहरातील जिनिंग व्यवसायात काम करणारे गरीब व गरजू कामगार व परिसरातील अनाथ गोरगरीब कुटुंबांत 500 पेक्षा जास्त कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.असे एकूण 1000 कुटुंबाला दिवाळी फराळ म्हणून गुरुप्रसाद वाटप करण्यात आला.

या उपक्रमाला तालुका प्रतिनिधी राकेश मकवाने, केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील, वसंतराव पाटील, राजेंद्र न्हायदे, संतोष सणांसे,प्रदीप झुंझारराव, प्रदीप महाजन,नाना भाई, प्रशांत फुलपगार, रवींद्र महाजन,कार्तिक भाटिया, सुनंदा पाटील, दमयंती पाटील, अनिता झांबरे, संगीता न्हायदे, चंदाताई पवार, मनीषा ठाकरे,वैशाली आहेर, कविता विंचुरकर,मनीषा पाटील, राजेंद्र चौधरी, निलेश पाटील, चेतन पाटील, जगदीश शिंदे यांनी सहकार्य केले.

Protected Content