अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया हे बुधवारी अमळनेर दौऱ्यावर असताना त्यांनी गडखांब गावासं भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी ग्राम पंचायत कार्यालयासं भेट दिला असता सरपंच यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पंकज आशिया यांनी ग्राम पंचायतीचा कामांचा आढावा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून घेतला. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. शाळेत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी शाळेच्या विविध उपक्रम व शालेय कामकाजाचा शिक्षकांकडून आढावा घेतला. अंगणवाडी केंद्रात देखील त्यांनी भेट दिली. तसेच सॅम मॅम बालकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन दिले. यावेळी गटविकास अधिकारी,पंचायत समिती व विविध विभागाचे कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, शिपाई, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेवीका आदी उपस्थित होते.