Home Cities जळगाव जळगावात इच्छादेवी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन

जळगावात इच्छादेवी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन

0
64

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  वीर सावरकर रिक्षा युनियन प्रणित इच्छादेवी शहरी रिक्षा स्टॉप व पेजो ॲपे रिक्षा स्टॉप भुसावळ प्रवासी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले.

 

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या हस्ते इच्छादेवी शहरी रिक्षा स्टॉप व पेजो ॲपे रिक्षा स्टॉप भुसावळ प्रवासी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले. यारसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक अधिकारी  लीलाधर कानलदे,  एम.आय.डी.सी.पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष  दिलीप सपकाळे, रवींद्र गिरासे ,मालती वाडीले (इच्छादेवी पोलिस चौकी), प्रियंका पाटील , राहुल भिवसाने,  श्री. घेटे,ठाकूर दादा आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी शाम लोही  यांनी  रिक्षा चालकांना वाहतूक नियम व कायदेशीर नियमांचे पालन करणे या संदर्भात मोलाचे  मार्गदर्शन केले. दिलीप सपकाळे यांनी देखील रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूक करताना योग्य पद्धतीने वाहतूक करणे , प्रवासी हा आपला महत्वाचा घटक आहे त्यांची  दखल घेणे अतिथी देवो भव यासदर्भात त्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसचालन व आभार – आनंदा सपकाळे,वाल्मीक सपकाळे यांनी केले.

इच्छादेवी शहरी रिक्षा स्टॉप व पेजो ॲपे रिक्षा स्टॉप भुसावळ प्रवासी पदाधिकारी व सदस्य -योगेश धनगर, सादिक शेख,  संजय पाटील, आसिफ पठाण, सागर पाटील, इस्माईल बागवान,  पोपट ढोबळे, पिंटू,रामदास भोस,  शिवाजी पाटील, रवींद्र कोळी, विजय कोळी, दिपक पाटील, जगदीश पाटील, प्रमोद चोपडे, सोपान कोळी, राकेश भंगाळे, नारायण नाळे, मधुकर नाले, ललित कोळी, सलमान पटेल, तनविस शेख, अझहर अली, रिझवान शेख,आकाश भालेराव, दिलीप पटेल, विकास कोळी, सुरेश मिस्त्री,आदी रिक्षाालकांची उपस्थिती होती.

 


Protected Content

Play sound