जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी चैतन्य बनसोडे यांची जळगाव जिल्ह्याच्या युवासेना विस्तारकपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

जळगाव व रावेर लोकसभेतील युवासेना विस्ताराची जबाबदारी चैतन्य बनसोडे यांच्यावर राहणार आहे. बनसोडे हे मुंबईचे असून या पूर्वी ते युवासेना सहसचिव म्हणून काम बघीत होते. बनसोडे यांना शिवसेना भवन येथील कार्यालयीन काम तसेच विद्यापीठ निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे.
सदर नियुक्तीचे माजी मंत्री सुरेशदादा जैन, शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, डॉक्टर मनोहर पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितिन लढ्ढा, युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, प्रा.समाधान महाजन, दिपकसिंग राजपूत, जिल्हा संघटक गजानन मालपूरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, युवासेना विस्तारक किशोर भोसले, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना जिल्हायुवाधिकारी तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, पियुष गांधी यांनी स्वागत केले.



