Home क्राईम जळगावातील अजिंठा चौकातून एकाची दुचाकी लांबविली

जळगावातील अजिंठा चौकातून एकाची दुचाकी लांबविली

0
30

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील अजिंठा चौकातील आर.सी. बाफना कंपनी समोरून एकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मंगळ पाटील (वय-५९) रा. द्वारका नगर, जुनाखेडी रोड, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान त्यांच्या घरासमोर त्यांची मालकीची (एमएच १९ एआर ३५५८) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा शोध सर्वत्र घेतला परंतु दुचाकी कुठेही आढळून आले नाही. अखेर त्यांनी शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.


Protected Content

Play sound