आदिवाल परिवाराचा धम्म दिक्षा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   शहरातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत हरीश प्रेमा आदिवाल व त्यांचे चिरंजीव व बामसेफचे कार्यकर्ता दिपक हरीष आदिवाल (एम. एस. ई .बी. कर्मचारी) यांच्यासह परीवारातील एकुण २० जणांनी “धम्मदीक्षा” घेण्याचा जाहीर निर्णय पाचोरा येथे घेतला आहे.

 

आदिवाल परिवाराचा धम्म दिक्षा घेण्याचा हा निर्णय ऐतिहासिक व परिवर्तनवादी समाजाच्या निर्मितीचे पहिलं आदर्श पाऊल ठरवत. संपूर्ण आंबेडकरी समाज व तत्सम पुरोगामी संघटनांनी आदिवाल परिवाराचे कौतुक केले आहे. आदिवाल परिवार आगामी ८ नोव्हेंबर रोजी धम्म दीक्षा घेणार आहेत.याकरिता  “धम्मदिक्षा” सोहळा समिती सुद्धा गठित करण्यात आली आहे.  या ऐतिहासिक व परिवर्तनवादी सोहळ्यास पंचक्रोशीतील जास्तीत जास्ती  आंबेडकरी समाज व पुरोगामी चळवळीच्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदर समितीत एक अध्यक्ष, सहा उपाध्यक्ष, एक संयोजक, एक खजिनदार व सोहळा समितीकार्य सदस्य यांची निर्मिती करण्यात आली आहे. यासमितीचे अध्यक्ष आनंद नवगिरे, उपाध्यक्ष आर. पी. बागुल, प्रकाश बनसोडे, भाऊराव पवार, गौतम निकम, संतोष कदम, बी. आय. अहिरे, संयोजक किशोर डोंगरे, खजिनदार राजेंद्र खर्चाने, व सोहळाकार्य सदस्य सुनिल  शिंदे, खलील देशमुख, पृथ्वीराज लोंढे, अॅड. अविनाश भालेराव, अशोक मोरे, अनिल लोंढे, शशिकांत मोरे, यशवंत सोनवणे, भालचंद्र ब्राह्मणे, दिपक तायडे, राजू गायकवाड, संगीता साळुंखे, पोर्णिमा सोनवणे व सर्व आंबेडकरी समाजातील लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॅाक्टर, नोकरदार आदी सामाजिक संघटना, पक्ष व कार्यकर्ते, नेते महिला युवक व युवती व पुरोगामी चळवळीच्या पाचोरा शहरातील सर्व संघटना यांचा समावेश आहे. आशी माहिती धम्म दिक्षा सोहळा समितीचे संयोजक व प्रसिद्ध प्रमुख किशोर डोंगरे यांनी दिली आहे.

Protected Content