Home क्राईम भुसावळ नगराध्यक्षांच्या काच बंगल्यावरील कर्मचाऱ्यावर तलवार हल्ला

भुसावळ नगराध्यक्षांच्या काच बंगल्यावरील कर्मचाऱ्यावर तलवार हल्ला

0
100

1522103940653

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याचा प्रत्यय आज नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यावर काम करणाऱ्या इसमावर तलवार हल्ला झाल्याने दिसून आला.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यावरील विहिरीवर पाणीपुरवठ्याचे काम करणार्‍या ४० वर्षीय व्यक्तीवर पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला करण्यात आला. या हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीने पसार झाले. विकास देविदास कोळी (वय ४०) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हल्लेखोरांनी डोक्यावर तसेच दोन्ही हातावर तसेच पायावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. जखमीला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून हल्ल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झालेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound