पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक होणार नसल्याचे भाकीत केले आहे.
राज्यात सध्या अस्थिर राजकीय स्थिती असल्यामुळे विधानसभेची मध्यावधी निवडणूक होऊ शकते असा विचार अनेकांनी मांडला आहे. प्रसारमाध्यमांमध्येच नव्हे तर विविध नेत्यांनी सुध्दा याबाबत भाष्य केले आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मात्र याच्या नेमकी विरूध्द भूमिका मांडली आहे. आज पुण्यात अजित पवार म्हणाले की, मध्यावधी निवडणुकीचा खर्च हा कोणत्याच आमदाराला परवडणारा नाही. यामुळे मध्येच निवडणूक होतील अशी अपेक्षा व्यर्थ आहे. विधानसभेच्या निवडणुका वेळेतच होणार असल्याचे ते स्पष्टपणे म्हणाले.