जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन जळगाव महाविद्यालयात रास-दांडिया २०२२ उत्साहात पार पडला.
कोरोना काळानंतर या वर्षी नवरात्रोत्सवात सर्वत्र गरबा, दांडियाची धूम असल्याने महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये रास-दांडिया २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निलिमा वारके यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीस देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, ‘नवरात्रीचे नऊ दिवस ‘मा दुर्गाच्या नऊ रुपांची‘ पुजा केली जाते आणि देवीला वेगवेगळ्या रंगाची साडी नेसविली जाते. या प्रत्येक रंगाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. जसे लाल रंग शारीरिक स्वास्थ व आनंद ठेवण्यास मदत करतो, गुलाबी रंग सौभाग्य, प्रेमाचे प्रतीक आहे. यावेळी जगात देवीची पूजा देवीच्या विविध रूपांची आराधना करताना मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे. देवी ही एक शक्तीचे प्रतीक आहे तशी शक्ती महिलांनी आत्मसात केली पाहिजे. महिलांचा आर्थिक विकास होण्यासाठी महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या बी.सी.ए, विद्यार्थ्यांनींनी पारंपारीक वेश धारण केलेला होता. यावेळी दांडिया क्वीन उन्नती तांबे, बेस्ट ड्रेस राखी साठे, बेस्ट परफॉर्मन्स काजल भोळे, दांडिया सजावटसाठी प्रथम क्रमांक वैष्णवी भावसार, उत्तेजनार्थ बक्षीस खुशी चौधरी या विद्यार्थ्यांनीना पारितोषिक देण्यात आले.
विद्यार्थ्यांनींनी सोलो डान्स सादर केला व वेगवेगळ्या गाण्यांवर गरब्याच्या ताली खेळल्या. प्रा. योगिता यांनी सजावटीचे कामकाज पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा. वैजयंती असोदेकर यांनी पाहिले. परिक्षकांचे काम महाविद्यालयाच्या डॉ. नीलिमा वारके व प्रा. मिताली शिंदे यांनी पाहिले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.