Home क्राईम चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

0
37

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथे एका सात वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील एका भागात सात वर्षीय मुलगी वास्तव्यास आहेत. सोमवारी ही मुलगी तिच्या घराजवळ राहत असलेल्या एका प्रौढाच्या घरी खेळायला गेली, यावेळी प्रौढाने या चिमुकलीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने याबाबत नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound