यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात कुणाला काहीही न सांगता २४ वर्षीय तरूण बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
पियुष यशवंत चौधरी (वय-२४) रा. डांभूर्णी ता. यावल असे तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पियुष हा वडील यशवंत देवीदास चौधरी यांच्यासह यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे वास्तव्याला आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतू तो कुठेही आढळून आला नाही. अखेर वडील यशवंत चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशाने पोलीस करीत आहे. या संदर्थात अधिक माहीती घेतली असता सदरचा पिऊष चौधरी नांवाचा तरुण हा पुण्याला असल्याचे कुणाच्या तरी मोबाईल वरून त्यांने सांगीतल्याचे वृत्त आहे .