निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार यांचा अटकपुर्व जामीन जिल्हा न्यायालयात फेटाळून लावला आहे.

याबाबत अधिक असे की, निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाचे पडसात राज्यात पडसाद उमटले होते. मराठा समाजाच्या मागणीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकालेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी किरणकुमार बकाले यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. अटकपुर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवून बकालेंचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला आहे.

दरम्यान,‍ निलंबित झाल्यापासून बकालें यांना नशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. परंतू नाशिक येथे हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. आज जिल्हा न्यायालयात कामकाज झाल्यानंतर त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Protected Content