जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात सोमवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक आमदार राजूमामा भोळे यांच्या स्थानिक आमदार निधीतून दिव्यांगांना सहाय्यक साहित्य कृत्रीम अवयव व उपकरणे वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कायक्रमाचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भारतमाता व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जळगाव शहरात भाजपाच्या सेवा पंधरवाडा अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्य, कृत्रिम अवयव उपकरणाचे देण्यात आले. शिवाय गरजू नागरीकांना अंत्योदय रेशनिंग कार्डचे वाटपही यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी बोरनार-म्हसावद गटातील काही कार्यकर्त्यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ, माजी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, ज्येष्ठ नेते पी.सी.आबा पाटील, नगरसेविका सुचिता हाडा, गटनेता भगत बालाणी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, भाजपाच्या नेत्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.