मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत उध्दव ठाकरे यांना मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. तसेच शिवसेना कुणाची याबाबत नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पालिकेचा निर्णय नाकारण्याचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. दादर पोलिसांचं संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.
यानंतर उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.