खामगांव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिराला भेट देऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने निळकंठ पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी मंदिरात पोहचून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी संस्थानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह संस्थानचे सेवाधारी उपस्थित होते.