Home Uncategorized चोरट्यांनी लांबविली चारचाकी व मोटर सायकल

चोरट्यांनी लांबविली चारचाकी व मोटर सायकल

0
51

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील भडगाव रोडवरील मोरया कन्स्ट्रक्शन भागातून एक चारचाकी व एक मोपेड मोटर सायकल चोरीस गेल्याची घटना समोर आली असून औरंगाबाद येथील दोन संशयित आरोपींविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये वाहन मालकाच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “नितेश गोवर्धन चव्हाण (वय – ३१) रा. गिनिरा तांडा, गेवराई, ता. जि. औरंगाबाद ह. मु. मोरया कन्स्ट्रक्शन, निर्मल रेसिडेंसिच्या मागे, भडगाव रोड, पाचोरा यांच्या मालकीच्या ५ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर (क्रं. एम. एच. २० – एफ. यु. ४०३९) ही पांढऱ्या रंगाची चारचाकी व ६० हजार रुपये किंमतीची टि. व्ही. एस. कंपनीची मोपेड (क्रं. एम. एच. २० एफ. डब्लयु. ७०३३) ही राखाडी रंगाची मोटर सायकल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

नितेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपी शुभम सुभाष राठोड रा. शिवगड तांडा, औरंगाबाद व राहुल शेषराव जाधव रा. बंबाड नगर, औरंगाबाद यांचेविरुध्द चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिपक सुरवाडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound