जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग होवू नये याकरिता कुसुंबे खु येथे गाय व बैल यांचे लसिकरण करण्यात आले.
लंपी या जिवघेण्या आजारापासून गाय व बैल यांचे सरक्षंण व्हावे. तसेच पहिलेच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवाना दिलासा मिळावा याकरिता गाय व बैल याचं लसीकरण आज. शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. हे लसीकरण नियोजनबध्दरित्या डॉ. योगेश पाटील, गोपाल शेळके, प्रतिक घुगे , मनोज पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे , वसंत पाटील, शिवाजी पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांसह आदींनी करवुन घेतले. त्यावेळी समस्त शेतकऱ्यांकडुन प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.