Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
23

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून संबंधित महिलांनी आपल्या तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी वनिता सोनगत  यांनी शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार सोमवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होईल अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound