मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मातोश्रीवर सातत्याने हल्लाबोल करणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी आज पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे.
रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवर किती खोके जातात हे जाहीर करू का ? असे आव्हान दिले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टिका केली आहे. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे हे मराठा नेत्यांचा द्वेष करत असून कुणी मराठा नेता मोठा झालेला त्यांना आवडत नसल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा खोक्यांवरून ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मातोश्रीवर कितीही मिठाईचे खोके गेले तरी त्यांना डायबेटीज होत नसल्याची खोचक टीका त्यांनी केली.