जुन्या भांडणाच्या कारणावरून विळ्याने वार !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डांभूर्णी शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला विळ्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद नारायण परदेशी (वय-४५) रा. पिंप्री ता. पाचोरा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल प्रकाश परदेशी, शरद प्रकाश परदेशी आणि प्रकाश गोविंदा परदेशी तिघे रा. डांभूर्णी ता. पाचोरा यांनी विनोद याला शिवीगाळ करून हातातील विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याला तुझा खून करेल अशी धमकी दिली. याप्रकरणी विनोद परदेशी याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल प्रकाश परदेशी, शरद प्रकाश परदेशी आणि प्रकाश गोविंदा परदेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राकेश खोंडे करीत आहे.

Protected Content